मुंबई : रिपब्लिक टीव्हीकडून एबीपी न्यूज, जैनेंद्र कुमार यांची माफी
Continues below advertisement
जिग्नेश मेवाणी यांची रॅली कव्हर करताना काही लोकांनी आपल्या प्रतिनिधीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत रिपब्लिक टीव्हीनं एबीपी न्यूजचे पत्रकार जैनेंद्र कुमार यांची चित्रं दाखवली. विशेष म्हणजे बराच वेळ जैनेंद्र यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं रंगवत त्यांची टीव्हीवरुन देशभर बदनामी केली. मात्र, ही बाब सोशल मीडियावर तातडीनं लोकांनी लक्षात आणून दिल्यानंतर रात्री उशीरा रिपब्लिक टीव्हीनं आणि त्यांच्या मुख्य संपादकांनी एबीपी न्यूज आणि जैनेंद्र कुमार यांची माफी मागितली.
Continues below advertisement