गोंदिया फेरमतदान : ईव्हीएममध्ये पुन्हा बिघाड
Continues below advertisement
मतदान यंत्रातील बिघाडामुळे गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत आज फेरमतदान होत आहे. 49 ठिकाणी आज पुन्हा मतदान घेतले जात आहे. 28 मे रोजी मतदानावेळी झालेल्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. मात्र आजही मतदान यंत्रातील बिघाडाच्या घटना घडत आहेत. गोंदिया शहरातील माताटोली येथील मतदान केंद्र 233 वर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. बटण दाबल्यानंतर 10 मिनिटांनी मतदान होत आहे. सकाळी तास-दीडतासभर हा बिघाड होता, तो दूर करण्यात आला. मात्र मतदान यंत्रात सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे त्यावरील प्रश्नचिन्ह गडद होत आहे.
Continues below advertisement