रेणापूर, लातूर : राम मंदिरातून पंचधातूच्या 12 मूर्ती चोरीला
लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक गाव असलेल्या रेणापूरमधील पुरातन राम मंदिरात चोरी झाली. या मंदिरातून तब्बल 12 पंचधातूच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत. अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिराच्या बांधणीत आर्थिक हातभार लावल्याचा इतिहास आहे. इथं सर्वात मोठी आणि अनमोल असलेली लक्ष्मणाची 25 किलोची पंचधातूची मूर्ती होती. त्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. चोरांनी या ठिकाणी असलेल्या पितळी मूर्ती मात्र चोरल्या नाहीत. यासंदर्भात ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.