AN-32 | बेपत्ता असलेले एएन 32 अरुणाचलमध्ये हेलिकॉप्टरमध्ये अवशेष दिसल्याची माहिती | ABP Majha
अरुणाचलच्या भागात बेपत्ता झालेल्या भारतीय वायुसेनेच्या विमानाची शोधमोहिम सुरु झाली आहे. एका हेलिक़ॉप्टरमधून बेपत्ता विमानाचे अवशेष दिसल्याची माहिती भारतीय वायूसेनेला मिळाली होती. त्यानंतर आज अरुणाचलच्या डोंगररांगात बेपत्ता विमानाचा शोध घेतला जातोय. आसामच्या दिब्रूगडमधून अरुणाचलसाठी वायूसेनेच्या एएन-32 विमानानं उड्डाण केलं होतं. मात्र नंतर ते विमान संपर्काबाहेर गेलं.