मुंबई : रिलायन्सचा 13 हजार 251 कोटींचा विद्युत व्यवसाय अदानींकडे
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रा कंपनीने आपला वीज प्रकल्प विक्रीत काढला आहे. अदानी ग्रुपसोबत 13 हजार 251 कोटी रुपयांचा सौदा झाल्याची माहिती रिलायन्स इन्फ्राने दिली आहे. रिलायन्स एनर्जी हा कंपनीचा विद्युत व्यवसाय अदानी ग्रुपच्या अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला विकण्यात आला आहे. विजेची निर्मिती करण्यापासून ट्रान्समिशनपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश यात होतो.