Rain Alert | घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता : आयएमडी | ABP Majha
Continues below advertisement
काल राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच विश्रांती घेतली असली तरी पुढील दोन दिवसात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
बंगालच्या उपसागरात वायव्येला कमी दाबाचा पट्टा पूर्ण झाल्यानं पश्चिम किनारपट्टी, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागातून देण्यात आली.
पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्य़ात घाटमाथ्यावर काही ठिकाणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात गडचिरोली, भंडारा, चंद्रपुर, गोदिंया या जिल्ह्य़ांना आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.