2000 रुपयांच्या नोटा छापून तयार, मात्र पुरवठा बंद : अहवाल
गेल्यावर्षीच्या नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेली रु. 2000 ची नोट पुन्हा बंद होते की काय अशा शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी हा अंदाज कुठल्याही व्हायरल व्हॉट्सअॅप पोस्टमधून किंवा स्वयंघोषित अर्थतज्ज्ञाने व्यक्त केलेला नाही, तर स्टेट बँकेच्या एका अहवालातून ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.