इन्वर्टर बॅटरीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दुकान जळून खाक | जळगाव | एबीपी माझा
ओव्हर चार्ज झाल्याने इन्वर्टर बॅटरीचा स्फोट होऊन दुकानाला भीषण आग लागल्याची घटना जळगावमधील रावेर शहरात घडलीय. छोरीया मार्केट भागातील दत्त कॉम्प्युटर या दुकानालात मध्यरात्री ही घटना घडली. या आगीत दुकानातील सामानासह 15 लाखांचं नुकासन झाल्याची अंदाज वर्तवला जातोय. अतिशय गजबजलेल्या बाजारपेठेत दत्त कॉम्प्युटर हे दुकान आहे... मात्र वेळीच अग्निशमन दलाचे बंब दाखल झाल्याने दुकानाला लागून असलेल्या इतर दुकानांना ही आग लागली नाही.