जळगाव : एकनाथ खडसेंकडून भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत
गेल्या 40 वर्षांपासून भाजपसोबत एकनिष्ठपणानं काम करतोय. मला भाजप सोडण्याची इच्छा नाही. पण माझ्यासमोर पर्याय नाही. अशा शब्दात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे संकते दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं काँग्रेस कार्यकर्ते राजू पाटील यांच्या एकसष्टीचा सोहळा होता. यावेळी एकनाथ खडसेंनी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. गेल्या चाळीस वर्षात एकदाही पक्ष बदल करण्याचा विचार केला नाही. असं सांगायलाही खडसे विसरले नाहीत.