स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : डॉल्फिन, प्रवाळ आणि शेकडो माशांचं रंगीबेरंगी जग, कोकणाच्या समुद्र तळाचे स्वर्ग
Continues below advertisement
रत्नागिरीचे समुद्रकिनारे आणि इथले निसर्ग सौंदर्य जगभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं. पण आता येऊ घातलेल्या वर्षाअखेर आणि नाताळच्या सुट्टीत पर्यटकांना रत्नागिरीत निसर्गाचे एक नवं दालन खुलं होत आहे. रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर प्रथमच मिऱ्या गावाजवळ स्कुबा डायव्हिंगमुळे पाण्यात स्वछंद बागडणाऱ्या शेकडो डॉल्फिन बरोबरच पाण्याखालची रंगीबेरंगी दुनिया अनुभवता येत आहे.
Continues below advertisement