रत्नागिरी : नाणार प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा महामोर्चा, भाजपवगळता सर्वपक्षीय पाठीशी

Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक पुन्हा आक्रमक झाले आहेत. रिफायनरीच्या विरोधात आज राजापूर तहसीलदार कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. भूमी कन्या एकता मंचच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहेत. गेले दहा महिने नाणार प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांचा लढा सुरु असून भाजप वगळता सर्वच पक्षांनी नाणारच्या ग्रामस्थांना पाठिंबा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram