रत्नागिरी : सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी
सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणातील पर्यटनस्थळ हाऊसफुल झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. कोकणचा हापूस, समुद्र किनारे आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी राज्य तसंच राज्याबाहेरुनही पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. दापोली, गुहागर, मालवण आणि देवबागच्या समुद्रकिनाऱ्यांवर लोकांची झुंबड पाहायला मिळत आहे. त्यातबरोबर गणपतीपुळे इथं देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचीही मोठी गर्दी दिसत आहे. विशेष म्हणजे सुट्ट्यांचा मुहूर्त साधत रत्नागिरीत मँगो सिटी रत्नागिरी पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरातही अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. उन्हाचा पारा वाढलेला असतानाही कोल्हापूर भाविकांनी फुलून गेलेलं पाहायला मिळत आहे.