रत्नागिरी/ रायगड : अवकाळी पावसाने अनेक भागांना झोडपलं
रत्नागिरीत चिपळूण शहराला दुपारनंतर वादळी पावसाचा जोरदार फटका बसला. मुख्य रस्त्यावरील छोट्या व्यावसायिकांच्या गाड्या या वादळात उलटून त्यांचं मोठं नुकसान झालं. अचानक आलेल्या या वादळाने चिपळूणकरांची चांगलीच धावपळ उडाली. वारा आणि पावसाच्या सरींनी चिपळूणमध्ये मोठं नुकसान केलं. रायगडमध्ये पोलादपूर परिसरात जोरदार गारपीट झाली. कापडे कामथे परिसरात गारांचा पाऊस झाला. माणगाव, महाड, बिरवाडी, खरवली परिसरात गडगडाटी पावसानं हजेरी लावली.