रत्नागिरीत घराला आग, दोन चिमुरड्यांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या साखरी नाटे गावात घराला आग लागून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. नमिर मुदसर दर्वेश (वय 7 वर्ष) आणि फातिमा मुद्सर दर्वेश (वय 5 वर्ष) अशी या दोन लहान मुलांची नावं आहेत. रविवारी (30 सप्टेंबर) रात्री दहाच्या सुमारास ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी अथक प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत नमिर आणि फातिमा या दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता. आग लागली त्यावेळी या मुलांचे आई-वडील शेजाऱ्यांकडे काही काम निमित्ताने गेले होते.