रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पासाठी नाणारमधील एक इंचही जमीन देणार नाही : उद्धव ठाकरे
Continues below advertisement
उद्धव ठाकरे यांनी आज नाणारमध्ये जाहीर सभा घेत, नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला. कोकणाला उद्ध्वस्त केलं, तर तुम्हाला उद्ध्वस्त करु. नाणारचा प्रकल्प शिवसेना होऊ देणार नाही, त्यासाठी नाणारवासियांची एकजूट कायम ठेवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या पवित्र भूमित नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. कोकणवासियांच्या मूळावर उठणार प्रकल्प कशाला? कोकणातला हा प्रकल्प विदर्भात न्या. कोकणचं गुजरात होऊ देणार नाही. भूसंपादन होणार नाही म्हणजे प्रकल्पच होणार नाही. प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच गुजराती, मारवाड्यांनी इथे जमिनी कशा खरेदी केल्या? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
Continues below advertisement