मुंबई : मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय, राज्यात कुठे काय परिस्थिती?

Continues below advertisement
आज अखेर मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा संपली.. काल मध्यरात्री मान्सूच्या पावसानं मुंबईत वर्दी दिली... आज दिवसभर मुंबईत पावसानं जोर धरला होता.. आता पाऊस उघडलाय...  मुंबईचा पहिला पाऊस हा मुंबईकरांना नेहमीच हवाहवासा वाटतो.. असं असलं तरी मुंबईची तुंबई मुंबईकरांसाठी काही चुकलेली नाहीए... दरवर्षीप्रमाणं आजही मुंबई आणि परिसरात झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच भंबेरी उडवली. तिकडे कोकणाला मान्सून फक्त शिवून पुढे सरकला.. कारण कोकणात काल पावसानं तोंड दाखवलं मात्र त्यानंतर गायब झालाय... त्यामुळे कोकणातला शेतकरी प्रतीक्षेत आहे... तर तिक़डे मराठवाड्यातल्या काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे... उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये कोरडेठाक पडलेल्या धबधब्यांना पाझर फुटलंय.. मात्र ही परिस्थिती काहीच ठिकाणी आहे.. इतर ठिकाणी फक्त पावसाची वातावरण निर्मिती आहे... तिकडे विदर्भात मध्यरात्री पाऊस बसरला मात्र अजूनही विदर्भवासियांना मुंबईसारखा पाऊस अपेक्षित आहे... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram