रत्नागिरी: मिरजोळे गावात जमीन खचली

Continues below advertisement
रत्नागिरीतल्या मिरजोळे गावात आज पुन्हा जमीन खचल्याचा प्रकार घडलाय... मिरजोळे गावातल्या नदीकाठची जमीन खचण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे... त्यामुळे पूर्णत: शेतजमीन असलेला भाग खचल्यामुळे मिरजोळे गावातल्या अनेक घरांना धोका निर्माण झालाय... ग्रामस्थांनी अनेकदा शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन त्य़ांना खचणाऱ्या भागावर उपाययोजना करण्याची मागणी केली... मात्र, ग्रामस्थांच्या हाती आश्वासनांशिवाय काहीच आलं नाही,...तरी, गेले काही दिवस कोकणात मुसळधार पावसाची बरसात होतेय... त्यामुळे कालपासून जमीन पुन्हा एकदा खचायला सुरुवात झाली आहे.. आणि आजही या जमिनीचा मोठा भाग पुन्हा खचला आहे.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram