रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह, ग्रामदेवतांची मंदिरं सजली
Continues below advertisement
शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा सण. यानिमित्ताने कोकणातल्या विविध सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांचं देखील दर्शन घडतं. कोकणात शिमगोत्सवाला सहा दिवसांपुर्वीच सुरुवात झाली. वेगवेगळ्या ग्रामदेवतांच्या पालख्या देवळाबाहेर पडल्या आहेत. प्रत्येकजण या पालख्या डोक्यावर घेऊन शिमगोत्सव साजरा करतोय. यानिमीत्ताने गावकरी सजवलेल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जमतात आणि मग देवांच्या मुर्त्यांना वस्त्र आणि अलंकारासहित पालखीत विराजमान केलं जातं. गावचा उत्सव सुरळीत पार पडावा म्हणून मग गुरव पहिलं गाऱ्हाणं घालतो. मुख्य होळीच्या दिवशी ग्रामस्थ जंगलात जाऊन छोट्या छोट्या होळ्या आणतात. मग होळीची पुजा करुन त्याभोवतीच होम पेटवला जातो.
Continues below advertisement