रत्नागिरी : कोकणातल्या किनाऱ्यांवर समुद्राला उधाण, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement
कोकणातल्या बहुतांश सर्वच किनाऱ्यांवर आज समुद्राला उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. काल हवामान खात्याने समुद्र किनारी सतर्कतेचा इशारा दिला होता. यामध्ये समुद्र किनारी वाऱ्याचा जोर अधिक राहील आणि किनार पट्टीच्या भागात उंच लाटा उठण्याची शक्यता वर्तवली गेली होती. आज दुपार पासूनच रत्नागिरी च्या मिर्या समुद्र किनारी उंच लाटा किनाऱ्याला येऊन थडकत आहेत. साधारणपणे पावसाळ्याच्या दरम्यान अशाप्रकारच्या लाटा येत असतात. कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर आलेल्या पर्यटकांचा मात्र यामुळे हिरमोड झाला आहे.
Continues below advertisement