रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून लांजा, संगमेश्वर भागात जोरदार पाऊस झालाय. लांज्यात १८७ मिलीमिटर तर संगमेश्वरमध्ये ११४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीने तर खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड शहराच्या मच्छी मार्केट भागातही पुराचं पाणी चढलं आहे. दरम्यान सतर्कतेचा इशारा म्हणून रत्नागिरी शहरातील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Continues below advertisement