रत्नागिरी : मुंबईतील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू
Continues below advertisement
रत्नागिरी : मुंबईतल्या पाच जणांचा रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला आहे. पर्यटनासाठी गेलेल्या बोरीवलीतील डिसुजा कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला.
सर्व जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
एकूण सहा जण आरेवारे समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले असता पाण्यात गेले. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे सर्व जण पाण्यात वाहून गेले, मात्र यातील एक महिला बचावली.
रेंचर डिसुजा (वय 19), मॅथ्यू डिसुजा (वय 18), केनेथ डिसुजा (वय 54), मोनिका डिसुजा (वय 44) आणि सनोमी डिसुजा (वय 22) अशी मृतांची नावं आहेत. तर रिटा डिसुजा यांना वाचवण्यात यश आलं.