रत्नागिरी : खेडमधील बस अपघातप्रकरणी चालकाला 10 वर्षांची शिक्षा
19 मार्च 2013 ला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात महाकाली ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसला भीषण अपघात झाला होता. चालकाच्या बेजबाबदारपणामुळं बस जगबुडी नदीच्या पात्रात कोसळली होती. या अपघातात 37 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. या अपघातासाठी कारणीभूत ठरलेला चालक संताजी किरदत याला 10 वर्षांची शिक्षा सुनावलीय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड न्यायालयानं शिक्षा सुनावताना संताजीला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.