BEST BUS | बेस्टच्या प्रवासासाठी 5 किमी अंतरासाठी फक्त 5 रुपये मोजावे लागणार | मुंबई | ABP Majha

पुढील काही महिन्यांतच बेस्ट बसचा ताफा दुपटीनं वाढणार असतानाच तिकीट दर कमी करण्याचा निर्धार बेस्ट उपक्रमानं घेतला आहे. त्यामुळे पहिल्या पाच किमी अंतरासाठी अवघे 5 रुपये तिकीट आकारण्याचा प्रस्ताव बेस्टनं मांडला आहे. सध्या बेस्टचं 2 किमीसाठी किमान तिकीट 8 रुपये आहे. विशेष म्हणजे एसी बसच्या पहिल्या टप्प्यासाठीही केवळ 6 रुपये तिकीट आकारले जाणार आहे. मात्र ही प्रस्तावित दरकपात असून यावर आजच्या बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram