ब्रेकफास्ट न्यूज : ‘बलात्कार ही विकृतीच’, पंतप्रधान मोदींचं कठुआप्रकरणी वक्तव्य

Continues below advertisement

‘बलात्कार हा बलात्कारच असतो, बलात्कार ही एक विकृती आहे.’ अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी कठुआ बलात्कारप्रकरणी दिली आहे. लंडनमधल्या ‘भारत की बात’ कार्यक्रमात ते बोलत होते.

कठुआमध्ये 8 वर्षीय बालिकेवर अत्यंत निर्घृण आणि निर्दयी पद्धतीनं बलात्कार करण्यात आला.  त्यानंतर आरोपींच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमधल्या बार काऊन्सिलनं मोर्चाही काढला. यामध्ये हिंदुत्तवाद्यांचा समावेश होता.  त्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती.

पंतप्रधान मोदी हे सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर असून त्यांनी या ‘भारत की बात’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेथील भारतीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram