रांची : धोनीची मुलगी झिवासोबत विराटचे बोबडे बोल
Continues below advertisement
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी 20 सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आता रांचीमध्ये दाखल झाला. यावेळी कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीच्या घरी भेट दिली. धोनीची मुलगी झिवाबरोबर खेळतानाचा व्हिडिओ विराटने ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओत विराट झिवाबरोबर बोबडे बोल बोलताना दिसतो आहे. लहानग्या झिवाबरोबर घालवलेला वेळ खुपच छान होता असं म्हणत विराटने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Continues below advertisement