रांची : जीवाला धोका, शस्त्रास्त्र बाळगण्याची परवानगी द्या : साक्षी धोनी
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या पत्नीने शस्त्रास्त्र बाळगण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. रांची जिल्हा प्रशासनाकडे साक्षी धोनीने ही मागणी केली आहे. रांचीमध्ये मी बहुतांश वेळा एकटीच राहते. कामाच्या निमित्ताने मला एकटंच बाहेर जावं लागतं. माझ्या जीवाला धोका आहे, असं मला वाटतं. त्यामुळे मला रिव्हॉल्वर मिळावी, असं साक्षीचं म्हणणं आहे.