रांची : लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा, धक्क्यानं मोठ्या बहिणीचं निधन
Continues below advertisement
राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादवांना चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर यादव कुटुंबाला आणखी एक धक्का बसलाय...लालूंच्या मोठ्या बहिण गंगोत्री देवींचं लालूंच्या शिक्षेच्या धक्क्यामुळे निधन झालंय...दरम्यान बहिणीच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी लालूंचे वकील त्यांच्या पॅरोलसाठी अर्ज करणार असल्याचं कळतंय....गंगोत्री देवी या लालूंच्या एकलुत्या एक बहीण होत्या....दरम्यान चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं लालूंना साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावलीये...तसंच जामीनासाठी त्यांना हायकोर्टाचा दरवाजा ठोठावा लागणार आहे...सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात लालू माळीकाम करतील...कामापोटी त्यांना दररोज 93 रुपये मजुरीही मिळणार आहे...
Continues below advertisement