रांची : लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा, 5 लाखांचा दंड
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालूंना या प्रकरणी जामीन मिळणार नाही. दंड भरला नाही, तर लालूंना सहा महिने अधिक तुरुंगात राहावं लागेल.
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने ही शिक्षा सुनावली. राजदसह बिहारमधील राजकारणात अत्यंत मोठी घडामोड आहे.
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने ही शिक्षा सुनावली. राजदसह बिहारमधील राजकारणात अत्यंत मोठी घडामोड आहे.