रांची : चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना उद्या शिक्षा सुनावली जाणार
चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्यावरील सुनावणी आज होणार नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय. चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यांच्यासह एकूण 16 जणांना दोषी ठरविण्यात आलं आहे. यातील केवळ चार दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं. तर लालूंवरील फैसला उद्या होणार आहे. दरम्यान, न्यायालयात लालू आणि न्यायाधिश यांच्यात विनोदी संवाद झाल्याचंही कळतंय.