रामपूर/ उत्तर प्रदेश : लष्करातील जवान सतत मरणारच, भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Continues below advertisement
सीमेवर प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांबद्दल एका भाजप खासदाराने आपली अक्कल पाजळली आहे. आर्मीचे जवान तर रोज मरणार, असा कुठला देश आहे का, की ज्याचे जवान मरत नाहीत. गावातही छोटी मोठी भांडणं होतात. तिथंही कुणीतरी जखमी होतोच, असं म्हणत रामपुरचे भाजप खासदार नेपाळ सिंह यांनी शहीदांबद्दल बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना या खासदाराने गल्ली बोळातील भांडणं आणि सीमेवरील युद्धाची तुलना केली.
Continues below advertisement