यवतमाळ | पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, उभ्या पिकासोबत 13 दुबती जनावरंही वाहून गेली

यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. रामगाव, राजेश्वर इथल्या एका शेतकऱ्याची पिकं तर आडवी झालीच, शिवाय तब्बल १३ दुबती जनावरंही मृत्यूमुखी पडले आहेत. या गावातले भीमराव गजभिये यांचं संपूर्ण अर्थकारण शेती आणि जनावरांवर अवलंबून होतं. म्हशी आणि गायींच्या दुधातून दररोज हजार ते पंधराशे रुपये मिळत होते.
पिकाबरोबरच शेतीसाहित्याचंही मोठं नुकसान झालंय. पुरात आमची जिंदगी वाहून गेली, असं म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करुन दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola