हैदराबाद : राम मंदिराचं काम 2019 निवडणुकांपूर्वी सुरू करणार- अमित शाह
Continues below advertisement
2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपनं पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा देण्याचं ठरवलं आहे. काऱण आयोध्येत राम मंदिर बांधकामाला निवडणुकीपूर्वी सुरुवात केली जाईल असं भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलंय. काल हैदराबादमध्ये आमित शाह यांनी भाजप नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हे सुतोवाच केलं आहे. अमित शहांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. काल हैदराबादमध्ये तेलंगणा राज्याच्या भाजपा कार्यलयात ही बैठक पार पडली. थोडे दिवस धीर धरा, अयोध्येत राम मंदिर नक्की होईल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं. आता अमित शहांनीही हा नारा दिला आहे. सध्य राम मंदिराचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे.
Continues below advertisement