राळेगणसिद्धी : जनलोकपालसाठी अण्णा हजारेंनी पुन्हा रणशिंग फुंकलं

Continues below advertisement
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा जनलोकपाल आंदोलनाचं रणशिंग फुकलं आहे. जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अण्णा दिल्लीत जनलोकपालसाठी आंदोलन छेडणार आहेत. दोन दिवसीय नियोजन बैठकीत अण्णांनी हा निर्णय जाहीर केला. लोकपाल आणि लोकायुक्तच्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त देशासाठी जनलोकपाल गरजेचा असल्याचं अण्णांनी म्हटलं. आता आगामी काळात राज्यांच्या निवडणुका असल्यानं भाजप सरकार अण्णांचं आंदोलन कशाप्रकारे हाताळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram