UAPA Bill | आता एका व्यक्तिलाही दहशतवादी ठरवता येणार, यूएपीए विधेयक राज्यसभेत मंजुर | ABP Majha
एका व्यक्तीला देखील दहशतवादी घोषित करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार सरकारी यंत्रणांना देणारे बेकायदा कृत्य प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक (यूएपीए) २०१९ आज राज्यसभेत मंजूर झाले. मोठ्या वादविवादानंतर मंजूर झालेल्या या विधेयकाच्या बाजूनं १४७ तर, विरोधात ४२ मतं पडली. त्यामुळे आता एका व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करता येणार आहे. पूर्वी दहशतवादी घोषित होण्यासाठी संघटनेची गरज लागणार नाही. दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारचं हे मोठं यश मानलं जात आहे.