VIDEO | स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टींची भाजपविरुद्ध आघाडी? | एबीपी माझा
भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी समविचारी पक्षांना सोबत घेत महाआघाडी करण्याची तयारी करत आहेत. मात्र, दुसरीकडे या आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी चौथी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.