राजस्थानची धुरा गेहलोत, मध्य प्रदेशाचं नेतृत्व कमलनाथांकडे? | एबीपी माझा
मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटल्याचं समजतंय. राहुल गांधींशी बोलणी झाल्यानंतर शेवटी ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. दिल्लीतील हायकमांडच्या निर्णयानंतर हे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. तर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं. मात्र अशोक गेहलोत यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे