रत्नागिरी : राजापूरमध्ये रिफायनरी प्रकल्पासाठी भूसंपादन, स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
रत्नागिरीत अणूऊर्जा प्रकल्पापाठोपाठ सरकरानं रिफायनरीचा प्रकल्प सुरु करण्याची तयारी केली. मात्र या प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरजवळचे ग्रामस्थ एकत्र आलेत. या प्रकल्पासाठी सरकार तब्बल पंधरा हजार एकर जमीन ताब्यात घेणार आहे. या जमिनीतील 3200 हून अधिक कुटुंब विस्थापित केली जातील तर आठ हजारहून अधिक शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागणार आहेत. या जमिनीच्या मोजणीसाठी आज अधिकारी दाखल झाले आहेत. त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला. इथं मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.