रत्नागिरी : नाणार प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार, तहसील कार्यालयाला घेराव

Continues below advertisement

रत्नागिरीतील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. आज या परिसरातील हजारो शेतकरी आणि मच्छिमार सरकार विरोधात रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे या मोर्चात महिला, वृद्ध आणि अगदी लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाली होती . भूमी कन्या एकता मंचच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी हजारो आंदोलकांनी तहसील कार्यालयाला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात मनसे, काँग्रेस, स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.. तर शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी मोर्चापासून लांब राहणंच पसंत केलंय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram