VIDEO | ठाण्यात मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा, विधानसभेसाठी रणनिती आखायला सुरुवात | एबीपी माझा

लाव रे तो व्हीडिओ म्हणत भाजप नेत्यांना घाम फोडणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केलीय. ठाण्यामध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. लोकसभेत मनसेनं एकही उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता. मात्र विधानसभेच्या तयारीसाठी राज ठाकरेंनी लोकसभेच्या मैदानाचा पुरेपूर वापर केला. पक्षात आलेली मरगळ झटकून मनसे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये उत्साह फुंकण्याचं आव्हान राज ठाकरेंसमोर असणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola