Raj Thackeray at Mamledar Misal | राज ठाकरेंनी घेतला ठाण्यातील 'मामलेदार मिसळ'चा आस्वाद | ठाणे | ABP Majha

कल्याणमधील सभा संपवून मुंबईकडे परतत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात मामलेदार मिसळचा आस्वाद लुटला. यावेळी त्यांचा सोबत अमित ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते होते. मामलेदार मिसळ ही राज ठाकरे यांची आवडती मिसळ असल्याचे सांगितले जात होते. त्याचा प्रत्यय काल दिसून आला. राज ठाकरे मिसळ खायला आल्याचे समजताच आजूबाजूच्या लोकांनी मामलेदार मिसळ दुकानाच्या बाहेर प्रचंड गर्दी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola