कल्याणचा ऐतिहासिक पत्री पूल अखेर इतिहासजमा होणार | एबीपी माझा

कल्याणचा ऐतिहासिक पत्री पूल अखेर इतिहासजमा होणार आहे. येत्या रविवारी मध्य रेल्वेकडून 6 तासांचा विशेष मेगाब्लॉक घेऊन पत्री पुलाचा गर्डर उचलला जाणार आहे. या मेगाब्लॉकच्या काळात डोंबिवली ते कल्याणदरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. सीएसएमटी ते डोंबिवली या दरम्यान सेवा सुरु असणार आहे तसेच कल्याण ते कसारा, कल्याण ते कर्जत यादरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत, याशिवाय अनेक एक्स्प्रेसचे मार्गही बदलण्यात आले आहेत. त्यामुळे गावावरुन परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. रेल्वेसेवा सहा तास बंद राहणार केडीएमटीकडून कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान विशेष बससेवा चालवली जाणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola