कशी असेल रेल्वेची परीक्षा?
Continues below advertisement
रेल्वेनं आपल्या सर्वात मोठ्या नोकरभरतीची तारीख जाहीर केली आहे. तब्बल ९० हजार पद रेल्वेकडून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ९ ऑगस्टपासून परीक्षा घेतली जाणार आहे. रेल्वेची ही ऑनलाईन परीक्षा देशातील सर्व महानगरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २६ हजार ५०२ जागा भरण्यात येणार आहेत. असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ या पदांसाठी पहिल्या टप्प्यात परीक्षा घेतली जाणार आहे. कुणाची परीक्षा कोणत्या शहरात आहे याबाबतची माहिती २६ जुलैपासून प्रसिद्ध होणार आहे.
Continues below advertisement