रायगड | देवकुंड धबधब्यात पुण्याच्या तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू
रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये देवकुंड धबधब्याच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. रविवारी दुपारी ही घटना घडली. तीनही पर्यटक पुण्याचे रहिवासी होते. संदीप सिंग, सतिंदर लांबा आणि विश्वजीत कुमार अशी बुडालेल्या तिघांची नावं आहेत.