रायगड : मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, रेल्वेवरही परिणाम, प्रवाशांचे हाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jul 2018 06:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई, कोकण, नागपूरसह विदर्भातील अनेक भागात सध्या जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. महाड, पोलादपूर, कर्जत आणि माथेरान परिसरात दमदार पाऊस झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवलीमध्ये मुसळधार पाऊस झालाय. तिलारी आणि कर्ली नदीला पूर आलाय. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय.