Shivrajyabhishek Sohala | 346 व्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह, देशभरातले शिवभक्त रायगडावर दाखल | ABP Majha

Continues below advertisement
आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 346 वा शिवराज्याभिषेक दिन आहे. यानिमत्ताने रायगड किल्ल्यावर राज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण रायगड किल्ला सजवण्यात आला आहे. ढोल-ताशे, लेझीम आणि पोवाड्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना यावेळी मानवंदना देण्यात आली. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. तर सकाळी साडेनऊ वाजता महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले (कोल्हापूर) उपस्थित होते. 10 वाजून 10 मिनीटांनी मेघडंबरीत महाराजांना सुवर्ण नाण्याचा अभिषेक करण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram