रायगड : तिथीप्रमाणे आज रायगडावर 345 वा शिवराज्याभिषेक सोहळा
Continues below advertisement
जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे आज रायगडावर 345 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून रायगडावर या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झालीय. ढोल ताशांच्या गजर आणि हजारो शिवभक्त यांच्या उत्साहात रायगडावर हा सोहळा सुरु आहे. त्यातच पाऊस आणि धुके यामुळे रायगडाची ही दृश्ये मनोहारी दिसत आहेत.
Continues below advertisement