रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्यावरुन परतत असताना दरड कोसळून शिवप्रेमीचा मृत्यू
Continues below advertisement
रायगडावरुन काल शिवराज्याभिषेक सोहळ्यावरुन परतत असताना एका शिवप्रेमीचा मृत्यू झाला आहे. रायगडच्या महादरवाजातून बाहेर पडल्यानंतर अंगावर दरड कोसळल्यानं या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अशोकदादा उंबरे असं मृत शिवप्रेमीचं नाव असून तो मूळ उस्मानाबादचा आहे. याबरोबर या दुर्घटनेत इतर ६ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
Continues below advertisement