मुंबई | राम कदम यांच्या माफीनाम्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बेताल बादशाह राम कदम यांनी तीन दिवसानंतर जाहीर माफी मागितली आहे.
ट्विटरवरुन त्यांनी आपलं स्टेटमेंट जाहीर केलंय. मात्र माफी मागतानाच राम कदम यांनी आपल्या वक्तव्याचा हितशत्रूंनी विपर्यास करुन वाद निर्माण केल्याचा आरोप केलाय.
दहीहंडीच्या दिवशी राम कदम यांनी जाहीरपणे एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली असेल आणि मुलाच्या आईवडिलांची परवानगी असेल तर आपण मुलगी पळवून आणू, असं विधान राम कदम यांनी केलं होतं.
या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट होती. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी राम कदम यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली होती. मात्र अद्यापही भाजपच्या प्रवक्त्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच या प्रकरणी मौन बाळगल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola