VIDEO | कोरा वेबसाईटवर आता मराठीत उत्तरं आणि माहिती मिळवा! | मुंबई | एबीपी माझा

आपल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं, कोणत्याही प्रकारची माहिती गुगलनंतर कुठे मिळत असेल तर ती आहे कोरा वेबसाईट. गुगलपेक्षा एखाद्या गोष्टीबद्दल अधिक विस्तृतपणे माहिती या कोरावर आजतागायत फक्त इंग्रजीमध्ये मिळायची. मात्र आता कोरा वेबसाईट मराठीत आल्याने आपल्या प्रश्नांची उत्तरं, माहिती आता मराठीत मिळणार आहे. शिवाय एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल ते सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर देऊ शकणार आहात. कोरा वेबसाईट इंग्रजीमध्ये 2009 साली माहितीची देवाणघेवाण करता यासाठी सुरु करण्यात आली. त्यानंतर दहा वर्षांनंतर ही वेबसाईट आता मराठीत सुरु करण्यात आली आहे. कोरा वेबसाईट आता एकूण 17 भाषेत असणार आहे. यामध्ये मराठी भाषेत असल्याने मराठी भाषिक व्यक्तीसाठी माहितीचा खजिना मराठीत उघडला आहे. या वेबसाईटवर तुम्ही कोणतेही प्रश्न विचारु शकता. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्याविष्यातील तज्ज्ञ व्यक्तीकडून मिळू शकतं. शिवाय तुम्ही सुद्धा, तुम्हाला माहित असलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन इतरांना मदत करु शकता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola