ब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा
आजचा दिवस पुस्तकदिवस म्हणून साजरा केला जातो. वाचाल तर वाचाल हे आपण अगदी शाळेत असल्यापासून ऐकतोय आणि पुस्तकवेडी माणसं कितीही बिझी असली तर पुस्तक वाचायला नक्की वेळ काढतात. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक हृषिकेश जोशी. हृषिकेशने लिहिलेलं नांदी सारखं नाटक असो वा घडलंय बिघडलंय सारख्या कलाकृती. त्याचा अभिनय पाहिला, त्याचं लिखाण नजरेखालून गेलं की चटकन लक्षात येतं की याचं वाचन अफाट आहे. त्यामुळे आज पुस्कदिनानिमित्त गप्पा मारुया हृषिकेश जोशीसोबत..